Devendra Fadnavis | पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रात बांधण्यात येणाऱ्या २० लाख घरांना सौर ऊर्जा प्रकल्प अंतर्गत मोफत वीज सुविधा उपलब्ध करणार, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना वीज बिल भरण्याची चिंता नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शनिवारी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रवाटप आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही महाराष्ट्रातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात १३ लाख ५७ हजार घरांची निर्मिती झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २० लाख घरांचे लक्ष्य आहे. यासाठी १ लाख ६० हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे, जी आता ५० हजार रुपयांनी वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प लावले जातील, आणि यामुळे लाभार्थ्यांना मोफत वीज उपलब्ध होईल. राज्य सरकार यासाठी अनुदान देईल, ज्यामुळे वीज बिलाची चिंता संपुष्टात येईल.”
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३ कोटी घरे बांधली जाणार आहेत, त्यापैकी महाराष्ट्राला अधिकाधिक घरे मिळवण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, “या योजनेमुळे राज्यातील २० लाख कुटुंबांना हक्काचे घर मिळणार असून, लाडकी बहिण योजना कायम राहील.”
हेही वाचा :
• शेतकऱ्यांनो तुम्हाला पीव्हीसी पाईप योजनेचा मेसेज आला का? 7 दिवसांत पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया