CSJ Champions League | जामखेडमच्या मैदानात रंगणार CSJ चॅम्पियन्स लीग; ८ संघांचा होणार जबरदस्त सामना

CSJ Champions League | जामखेड तालुक्यात क्रिकेट प्रेमींना एक अनोखी संधी मिळणार आहे. कारण येत्या ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ‘CSJ चॅम्पियन्स लीग’ (CSJ Champions League ) आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये ८ संघ सहभागी होणार असून प्रत्येक सामना ६ षटकांचा असेल. सामना काजी मैदान, सारोळा रोड, जामखेड येथे खेळवला जाणार आहे.

CSJ चॅम्पियन्स लीगचे आयोजक
आयोजकांनी या लीगची आकर्षक आणि तणावपूर्ण स्पर्धा आयोजीत केली असून, या लीगमध्ये क्रिकेटप्रेमींसाठी एक उत्तम व व्यावसायिक स्तरावरचा अनुभव मिळणार आहे. लीगचे आयोजन कपिल राऊत सर, अजित (टिल्लू) घायतडक, अरमान शेख, फराज काझी आणि आमिर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

कधी होणारं क्रिकेट सामने?
लीगचे सामने ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान खेळवले जातील, तर ९ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असणार आहे, जो अंतिम सामन्यासाठी राखीव ठेवला आहे. या दरम्यान ८ संघ एकमेकांविरुद्ध आपली ताकद आणि कौशल्य दाखवतील. प्रत्येक सामना ६ षटकांचा असणार असल्यामुळे खेळाडूंना एकाच ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा (रन) करणं हे आव्हान असणार आहे.

‘हे’ 8 संघ होणार सहभागी

  • जाणता राजा 11 जवळके
  • मेजर 11 जायभाय वाडी
  • A. A. A वॉरियर्स जामखेड
    • Kcc खर्डा
  • सावकार 11 जामखेड
  • शौर्य लाईट हाऊस जामखेड
    • गॅलक्सी सलून & युनिक कंस्ट्रक्शन जामखेड
  • AS वॉरियर्स जामखेड

कोणी केले स्पॉन्सर?
या क्रिकेट सामन्यासाठी विविध प्रतिष्ठित व्यावसायिकांनी स्पॉन्सर करण्यात आले आहे. प्रमुख प्रायोजकांमध्ये ओम साई ट्रेडर्स, नगरसेवक अमित भाऊ चिंतामणी, बाफना इंडस्ट्रीज, श्री समर्थ कांदा व्यापारी, एसपी ट्रेडर्स, जावळेश्वर मशिनरी, ग्लोबल मोटर्स, सुपर कार केअर, शीन मेडिकल, गरम पान शॉप, काझी कुरिअर, श्री गणेश ऑप्टिकल्स, हॉटेल गंगोत्री, काझी स्टोन क्रशर, एसटी वायकर, बेग टाइल्स आणि ग्रेनाइट, महाराष्ट्र टायर्स, जनता मेन्स कलेक्शन, राज कुलर आणि गॅलेक्सी हेअर सलून, शंभूराजे मेन्स वेअर अँड फुटवेअर यांचा समावेश आहे.

मीडिया पार्टनर
मीडिया पार्टनर म्हणून ilovekarjatjamkhed.com या वेबसाइटने याला आपल्या पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे या स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढणार आहे. या लीगमध्ये क्रिकेटप्रेमींना एकत्र येण्याची आणि आपली कौशल्ये दाखवण्याची उत्तम संधी मिळणार आहे. आयोजकांनी सर्व क्रिकेट प्रेमींना या लीगमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा:

अहमदनगर शहराच्या नामांतरास विरोध; जनहित याचिका दाखल

शिधाधारकांना धक्का! कर्जत- जामखेडमधील तब्बल ‘इतके’ रेशन कार्ड रद्द

Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x