Dhananjay Munde | महाराष्ट्रातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे संकट वाढले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून ते आधीच चर्चेत आहेत, पण आता त्यांच्यावर पीकविमा (Crop Insurance) घोटाळ्यामुळे आणखी लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे. मुंडे (Dhananjay Munde) हे भाजपच्या शिंदे सरकारमध्ये कृषीमंत्री असताना पीकविमा योजनेतील ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत प्रश्नोत्तराच्या वेळी महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याच्या बाबतीत विचारले. त्यांनी म्हटले की, राज्याचे विद्यमान कृषीमंत्री यांनी या घोटाळ्याची कबुली दिली आहे. पीकविमा योजनेत ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा इशारा देण्यात आले आहे, तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तो घोटाळा ५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना प्रश्न केला की, “तुम्हाला या घोटाळ्याची माहिती आहे का? आणि तुम्ही याची चौकशी करण्याचे आदेश द्याल का?”
यावर उत्तर देताना, शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, “जर असा घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.” केंद्रीय मंत्री चौहान यांच्या या स्पष्ट आणि ठाम उत्तरामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वाचा: शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र केसरी’ पुन्हा आयोजित करा; आमदार रोहित पवार यांचा प्रस्ताव
पीकविमा योजनेत पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताची चिंता करणारे धोरण राबवण्याचा दावा राज्य सरकार करत असले तरी, या घोटाळ्याच्या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सध्या मोठा वाद सुरू आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने या घोटाळ्याची खोलात जाऊन चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एक नवीन वळण येण्याची शक्यता आहे, कारण या प्रकरणामुळे राज्य सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.
हेही वाचा:
• उपमुख्यमंत्र्यांच्या मोठा निर्णय! धनंजय मुंडे यांना अजित पवार यांचा मोठा धक्का
• शेतातील सरपण पेटवल्यावरून जामखेडमध्ये सरपंचाच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला