Jamkhed Crime | जामखेड तालुक्यातील बसरवाडी येथील वृद्ध दांपत्यावर दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दोघांच्या ताब्यातून ५६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुन्ना उर्फ सतीष लायसन भोसले (वय २१) आणि किशोर उर्फ बुट्या हापुस भोसले (वय २०) अशी असून, ते दोघेही कासारी, ता. आष्टी, जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत. (Jamkhed Crime)
घटनेची अधिक माहिती अशी की, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी जामखेड तालुक्यातील बसरवाडी शिऊर येथील ७० वर्षीय काशीबाई सुर्वे आणि त्यांचे पती यांच्यावर तीन अनोळखी व्यक्तींनी दरोडा टाकला. यावेळी आरोपींनी वृद्ध दांपत्याला मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याचे दागीने जबरदस्तीने लंपास केले. या घटनेबाबत जामखेड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या माहितीच्या आधारावर २३ मार्च २०२५ रोजी जामखेड येथील नवले पेट्रोलपंपावर छापा टाकला आणि दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींच्या अंगझडतीत मुन्ना भोसलेकडून ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले, ज्याची बाजारभावी किंमत ५६,००० रुपये आहे.
हे तीन आरोपींनी एक महिन्यापूर्वी वृद्ध दांपत्यावर हल्ला केला होता, तर फरार आरोपी मोहन निकाळजे भोसले याच्या शोधासाठी पोलीस पथकाने शोधमोहीम सुरू केली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना जामखेड पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
हेही वाचा-
–Jamkhed | अरे देवा! माव्यानंतर जामखेडच्या तरुणाईला लावले नशिल्या पांनांचे व्यसन
–Jamkhed Depo | जामखेड आगाराला दोन नव्या बसांचा लाभ; पांडुरंग माने यांच्या प्रयत्नांना यश, टप्प्याटप्प्याने 25 बस मिळणारं