Shivsena | फडणवीसांचा ठाकरे गटाला मोठा धक्का! 35 नेत्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये केला प्रवेश

Shivsena | विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्के बसण्याचे थांबलेले नाहीत. सोमवारी ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लोहा-कंधार मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार असलेले पवार यांचे राजीनामा पक्षासाठी मोठा आघात मानला जात आहे. (Shivsena)

पवार यांचे राजीनामा गाजत असतानाच, भाजपा नेत्यांनी आणखी एक मोठा धक्का ठाकरे गटाला दिला. छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे 35 स्थानिक नेत्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती खूपच खालावली आहे. महापालिका निवडणुका जवळ येत असताना हा धक्का ठाकरे गटासाठी आणखी मोठा ठरला आहे.

नांदेडमधील एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यानंतर, भाजपने छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली पकड अधिक मजबूत केली आहे. भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांनी त्यांच्या स्थानिक प्रभावामुळे भाजपला आगामी महापालिका निवडणुकांत मोठी मदत होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

वाचा: कर्जत खालापूरच्या शिंदे गटाच्या आमदाराची तीव्र प्रतिक्रिया, “आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण…“

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या गळतीचे प्रमाण वाढत आहे. एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रातही पक्षाला गळती लागली आहे. काही जळगावमधील नाराज माजी नगरसेवक देखील आगामी काळात शिवसेनेतून बाहेर पडू शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील एका मोठ्या पक्षाचे धडे वाढत आहेत.

शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी तर 23 जानेवारीला एक मोठा राजकीय उलथापालथ होण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार, ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये सामील होऊ इच्छित असल्याची माहिती शेवाळे यांनी दिली. त्यामुळे 23 तारखेला काय घडणार, हे राजकीय वर्तमनात महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या एकजुटीला खिंडार पडताना दिसत आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांचा भाजपमध्ये होणारा प्रवेश हे आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहे.

हेही वाचा:

अहिल्यानगर जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेला धक्का, सरकारकडून कडक कारवाईची आवश्यकता

आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना आज मॉकपोल प्रक्रियेची माहिती, पाच उमेदवारांची माघार

Read Also:
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x