Free Sand Gharkul | राज्यातील घरकुल बांधणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो घरकुल धारकांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयाची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Free Sand Gharkul)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी वाळूच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही किंवा जिथे पर्यावरणीय मान्यता मिळालेली आहे, अशा ठिकाणांवर वाळूच्या खाणींचा लिलाव करण्यात येईल. यासोबतच घरकुल धारकांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
वाळूच्या पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार नवीन धोरण तयार करत आहे. “एम सँड” धोरण राबवून, प्रत्येक जिल्ह्यात खाण क्रशर्सना प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे दगड खाणीतून वाळू तयार होईल आणि नदीतील नैसर्गिक वाळूची मागणी कमी होईल. या धोरणामुळे वाळूच्या पुरवठ्यातील तफावत दूर होईल, अशी माहिती सरकारने दिली आहे.
यावर्षीपासून शासकीय बांधकामांमध्ये किमान 20 टक्के कृत्रिम वाळूचा वापर करणे अनिवार्य केले आहे. पुढील वर्षीपासून शासकीय बांधकामात पूर्ण कृत्रिम वाळू वापरणे बंधनकारक करण्यात येईल. या धोरणामुळे कृत्रिम वाळूच्या वापराला प्रोत्साहन मिळेल आणि पर्यावरणावर होणारा दबाव कमी होईल.
वाळूच्या उपशाच्या संदर्भात, सरकारने एक ठराविक वेळापत्रक तयार केले आहे. यामध्ये वाळू गटाचे प्रस्ताव, सर्वेक्षण, तालुका समितीची बैठक, जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक, पर्यावरण सल्लागाराला प्रस्ताव पाठवणे, खाणकाम आराखडा आणि तांत्रिक अहवाल यांचा समावेश असणार आहे. या निर्णयामुळे घरकुल धारकांसाठी एक महत्त्वाचा पाऊल पुढे टाकण्यात आले आहे.
हेही वाचा:
• आता सातबारा उतारा नसतानाही जमिनीची खरेदी करता येणार; फक्त ‘या’ 3 पद्धतींचा करा अवलंब
• नव्या आठवड्यात ‘या’ राशींबद्दल घडणार नकारात्मक गोष्टी, जाणून घ्या काय काळजी घ्यावी?