Grand Alliance Government | बिग ब्रेकिंग! सरकार अवघ्या तीनचं महिन्यात कोसळणार; शरद पवारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा 

राजकीय

Grand Alliance Government | राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटले आहे की, “तीन महिन्यांत राज्यातील सरकार कोसळून जाईल.” या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. पंढरपूरमध्ये बोलताना जानकर यांनी सांगितले की, “सरकारच्या पडण्याचे पुरावे मी सादर केल्यावर देशात मोठी गडबड होईल.” (Grand Alliance Government)

यावरून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्य सरकार शंभर टक्के कोसळून जाईल आणि पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागेल. जानकर यांनी सांगितले की, ईव्हीएममध्ये घोटाळा न झाल्यास माळशिरस आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, त्यात अजित पवार दहा हजार मतांनी पराभूत होतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

उत्तमराव जानकर यांनी अजून एक गंभीर आरोप केला. त्यानुसार, सरकार आणि वाल्मिक कराड यांच्यात तडजोडी झाल्या आहेत आणि त्यामुळे तीन आरोपी फरार आहेत. त्यांनी म्हटले की, आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली पाहिजे, पण तो हजर होणे पोलिसांसाठी एक मोठी नामुष्की ठरली आहे. “आकाच्या मागे कोण आहे? हे गृह विभागाने शोधून काढावे. जर ते सापडत नसेल, तर गृह विभाग मला द्या, मी सगळं शोधून काढतो,” असं देखील जानकर यांनी सांगितले.

वाचा: वयाच्या 22व्या वर्षी जामखेडचा स्वरूपकुमार बिरंगळ सीए परीक्षेत प्रथम; आईच्या मार्गदर्शनाने घडवला इतिहास  

दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. भाजपला 132, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडीला मात्र तीनही पक्षांच्या एकत्र येऊन केवळ 50 जागा मिळाल्या. या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवरील शंका उपस्थित केली आहे, परंतु महायुतीकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. राजकीय वर्तुळात उठलेल्या या चर्चेमुळे आगामी काळात आणखी काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

जामखेडमधील अल्पवयीन मुलीची छेडछाड; दोन आरोपी अटक, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

जामखेडच्या तरुणीची छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्या; मृतदेह ओढ्यात फेकला अन्… असा सापडला आरोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *