Home Guard Squad | जामखेड तालुका होमगार्ड पथकाच्या सचिवपदी बिभीषण यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. जामखेड तालुक्यात होमगार्ड पथकाची (Home Guard Squad) भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे, विशेषतः गुहेगारीला आळा घालण्यात. होमगार्डचे जवान पोलिसांच्या सहकार्याने जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहेत आणि त्यांची सेवा क्षेत्रातील प्रत्येक समस्यांवर मात करण्यासाठी महत्त्वाची ठरते.
जामखेड तालुक्यात सध्या ९८ होमगार्ड जवान कार्यरत असून, तालुका समादेशक डॉ. सुरेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने आपले कार्य सुसंगतपणे आणि निर्बाधपणे चालवले आहे. होमगार्ड पथकाच्या कार्याची गुणवत्ता व प्रगल्भता यामुळे स्थानिक प्रशासनासोबतच नागरिकांचेही लक्ष वेधले आहे.
वाचा: जामखेड पोलिसांकडून विद्यार्थ्यांना कायद्याची ओळख, कोणीही कायदे मोडण्याचा प्रयत्न करू नये: महेश पाटील
माजी अशंकालिक लिपीक नागेश घायाळ यांच्या राजीनाम्यानंतर, होमगार्ड पथकाच्या सचिवपदावर नेमणूक करण्यासाठी बिभीषण यादव यांचे नाव सुचवण्यात आले होते. यासाठी तालुका समादेशक कार्यालयाने शिफारशीचा प्रस्ताव जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावावर विचार करून, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी बिभीषण यादव यांची सचिवपदी नियुक्ती केली.
निवडीबद्दल एक विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. सुरेश काशीद यांच्या हस्ते बिभीषण यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ओंकार दळवी, उपाध्यक्ष समीर शेख, संजय फुटाणे, भरत आटोळे, अण्णासाहेब पवळ, होमगार्ड शिवाजी सातव, नासिर खान, विठ्ठल जाधव आणि माजी सरपंच गौतम गायकवाड उपस्थित होते.
बिभीषण यादव यांच्या नव्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे होमगार्ड पथक अधिक सुदृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून यापुढेही तालुक्यातील सार्वजनिक सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण योगदानाची अपेक्षा केली जात आहे.
हेही वाचा:
• अजित पवारांची पवार कुटुंबाच्या ऐक्याचा प्रयत्न आणि खासदारांच्या पुनर्वसनाची तयारी