Hoshing School | जामखेड तालुक्यातील ल. ना. होशिंग विद्यालयात पोलिस रेझिंग डे’ सप्ताहाच्या निमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायदा आणि पोलिसांचे कामकाज याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सांगितले की, आजच्या युगात कायदे बदलत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. कायदा मोडल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. (Hoshing School)
पोलिस दलाची स्थापना का आणि पोलिस दिवस साजरा का केला जातो, याबाबतही पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, पोलिस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करते आणि गुन्हेगारांना कायद्याच्या कठघऱ्यात उभे करते. या कार्यक्रमात पोलिसांनी विद्यार्थ्यांना डायल ११२, वाहतूक नियम, चाईल्ड लाईन आणि पोलिसांचे दैनंदिन कामकाज याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, पोलिसांनी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला.
वाचा: प्रा. राम शिंदे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार, ॲड. अभय आगरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.ए. पारखे यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच कायद्याची ओळख करून देणे आवश्यक आहे. यामुळे ते चांगले नागरिक बनतील. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वानीच या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला.
हेही वाचा:
• आज मानव जातीच अस्तित्त्व धोक्यात! पृथ्वीवर आदळणार २ लघुग्रह, NASA अलर्ट मोडवर