Jamkhed Accident | आज पहाटे जामखेड येथील अहिल्यानगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. बीडकडून जामखेडच्या (Jamkhed Accident) दिशेने जात असलेल्या एका कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिली, ज्यामुळे सीएनजी गॅस चा स्फोट झाला आणि कारला भयंकर आग लागली. या आगीत दोन व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये जामखेड पोलिस स्टेशनमधील एक पोलीस कर्मचारी आणि एक व्यापारी यांचा समावेश आहे.
सदर अपघात सोमवारी, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजता घडला. बीडहून जामखेडकडे येणारी कार डिव्हायडरला जोरात धडकली, ज्यामुळे त्यात स्फोट झाला आणि कारमध्ये आग लागली. या आगीमध्ये जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल आणि महादेव दत्ताराम काळे या दोघांचा मृत्यू झाला. महादेव काळे हे जामखेडमधील साईनाथ पान शॉपचे व्यापारी होते.
अपघातानंतर कार दुरूस्तीच्या नवीन तंत्रज्ञानामुळे लॉक झाली होती, त्यामुळे आत असलेल्या दोघांना बाहेर पडता आले नाही. सीएनजी गॅसचा स्फोट आणि आग इतकी भीषण होती की, गाडी जळून खाक झाली. मृतांची ओळख सुरूवातीला करण्यात अडचण आली, परंतु पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल गाडीत पडलेला होता. त्यावरून पोलीसांनी ओळख पटवली आणि अंदाज लावला की, गाडी मालक महादेव काळे आणि पोलीस कर्मचारी गुडवाल हे दोघेही त्या गाडीत होते.
आग इतकी प्रचंड होती की, गाडी संपूर्ण जळून खाक झाली. दुर्घटना घडल्या नंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर जामखेड पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, घटनेचे अधिक तपशील आता उलगडले जात आहेत.
हेही वाचा:
• अवघ्या 15 मिनिटांत कॅन्सरचं निदान! अमेरिकेला शक्य नाही झालं ते नागपूरच्या गुरु-शिष्यानं करून दाखवलं