Jamkhed Crime | छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह औंढा नागनाथ तालुक्यातील जंगलात फेकण्यात आलेल्या हृदयद्रावक प्रकरणात पोलिसांनी मोठा फटका मारला आहे. या प्रकरणात पोलिसांना घटनास्थळावर सापडलेले एक मॉलचे बिलच निर्णायक ठरले. या बिलाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Jamkhed Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी जवळ एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन करून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला. तपासात असे दिसून आले की, तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु, सुरुवातीला त्यांना कोणतीही यश मिळाले नाही. मात्र, नंतर पोलिसांनी घटनास्थळाची पुन्हा बारकाईने पाहणी केली असता त्यांना एक मोठी बॅग आणि छत्रपती संभाजीनगर येथील एका मॉलचे बिल सापडले. या बिलाच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग आला.
वाचा: नवीन वर्षाची सुरुवात: देशात पाच मोठे बदल…
पोलिसांनी या बिलाच्या आधारे तपास करून मृत महिलेची ओळख पटवली. ती जामखेड तालुक्यातील अलका बाजीराव बेद्रे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी मुगट तालुक्यातील रहिवासी असलेल्या श्रीकांत सुरेश पिनलवार याला हत्येच्या आरोपाखाली ताब्यात घेतले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की, अलका आणि श्रीकांत यांच्यात प्रेम संबंध होते. मात्र, काही कारणास्तव दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. याच रागाच्या भरात श्रीकांतने अलकाची हत्या केली आणि तिचा मृतदेह औंढा नागनाथ येथील जंगलात फेकून दिला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
हेही वाचा:
• सामान्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट! LPG गॅस ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; लगेच पाहा नवे दर