Ladaki Bahin Yojana | मोठी बातमी! आता फक्त ‘या’च महिलांना मिळणारं लाडकी बहीण योजनेचा लाभ; उपमुख्यमंत्री अजित पवार

Ladaki Bahin Yojana | राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आता केवळ गरीब महिलांसाठी लागू केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सोमवारी केली. योजनेतील सुधारणा करतांना गरीब महिलांना याचा लाभ मिळावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अजित पवार यांनी योजनेतील दुरुस्ती संदर्भात माहिती देताना सांगितले की, योजनेतील लाभार्थ्यांना निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. (Ladaki Bahin Yojana)

पवार यांनी यावेळी सांगितले की, राज्य सरकार समाजाच्या विविध घटकांच्या हितासाठी चालवलेल्या योजना बंद करणार नाही. मात्र, गरज संपलेल्या किंवा द्विरुक्ती असलेल्या योजनांना बंद केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती देताना सांगितले की, या योजनेत दुरुस्ती करतांना गरीब महिलांमध्ये आर्थिक सबलीकरण आणले जाईल, आणि यासाठी भांडवल म्हणून दिला गेलेला पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेची मजबूती करण्यासाठी वापरला जाईल.

सोमवारी, अजित पवार यांनी सांगलीमध्ये क्रांतीसिंह नानासिंह पाटील यांच्या स्मारकाच्या उभारणीची घोषणा केली. तसेच, नवी दिल्लीतील मराठी भाषकांसाठी एक सांस्कृतिक भवन उभारण्याचा प्रस्ताव देखील त्यांनी जाहीर केला. आर्थिक बाबतीत, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करत आहे. सरकार शून्य टक्के दराने कृषी कर्ज देण्याचा प्रयत्न करत आहे. वंचित आणि गरीब घटकांसाठी भरीव तरतूद केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

पवार यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकारने आगामी ५ वर्षांत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. महसुली तूट कमी करण्यासाठी सरकार उत्पन्नवाढ आणि अनुत्पादक खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना करत आहे.

नवीन वाळू धोरण संदर्भात, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले की, राज्य सरकार लवकरच नवीन वाळू धोरण जाहीर करेल. नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल. यामुळे पूर्वीचे वाळू धोरण मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा:

जामखेडचा नवीन आराखडा तयार करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता घरकुल धारकांना पाच ब्रास वाळू मिळणारं मोफत

Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
0
Would love your thoughts, please comment.x
()
x