Late night sleep : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेक लोक दिवसभर काम करून थोडा वेळ मोबाईल (Mobile phone use) किंवा लॅपटॉप (Laptop screen use) वापरण्यासाठी ठेवतात. सोशल मीडिया स्क्रोल करता करता किंवा वेबसीरिज बघता बघता मध्यरात्र कधी सरते, याची जाणीवसुद्धा राहत नाही. परिणामी रात्री उशिरापर्यंत जागरण करून सकाळी डोळ्यांत अर्धी झोप घेऊनच कामावर जावं लागतं. ही सवय दिसायला साधी वाटली तरी यामागे शरीराला आणि मनाला घातक ठरणारे परिणाम दडलेले असतात.
झोपेच्या कमतरतेचे परिणाम
रात्री उशिरा झोपल्यामुळे झोपेचं प्रमाण अपुरं राहतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो, कामावर लक्ष केंद्रीत होत नाही आणि उत्पादकता घटते. झोपेची कमी वेळ शरीरातील हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण करते. यामुळे वजन वाढ, पचनाच्या तक्रारी, केसगळती, त्वचेवर मुरुमं आणि अकाली वृद्धत्व यांसारखे त्रास वाढतात.
गंभीर आजारांचा धोका
उशिरापर्यंत जागणं फक्त थकवा किंवा सौंदर्याशी निगडित समस्या निर्माण करत नाही, तर गंभीर आजारांचा धोका वाढवतो. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास हृदयविकार (Heart disease risk) होण्याची शक्यता वाढते. तसेच डायबिटीज (Diabetes risk) सारख्या रोगांची शक्यताही अधिक होते.
आरोग्य सुधारण्यासाठी उपाय
झोपेची शिस्त पाळणं हा या समस्येवर सर्वात उत्तम उपाय आहे. दररोज एकाच वेळी झोपणं आणि उठणं ही सवय लावावी. झोपण्याआधी मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर कमी करावा. संध्याकाळी चहा-कॉफीसारखी कॅफिनयुक्त पेय टाळावीत. हलका व्यायाम, ध्यानधारणा यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. झोपण्याचं वातावरण शांत, अंधार आणि आरामदायी ठेवल्यास झोप पटकन लागते.