Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद अखेर संपत नाहीये. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने अप्रत्यक्षपणे आमदार रोहित पवार यांच्या प्रस्तावित ‘महाराष्ट्र केसरी‘ (Maharashtra Kesari) स्पर्धेला विरोध दर्शवला आहे. कुस्तीगीर संघाने कुस्तीपटूंना एक पत्र काढून, त्यांच्या स्पर्धेतील सहभाग नियमाबाह्य ठरवला आहे.
संघाने जारी केलेल्या पत्रात सांगितले आहे की, कुस्तीगीर संघाच्या बाहेरील कोणत्याही संस्थेच्या कुस्ती स्पर्धेत भाग घेणाऱ्या मल्लांची तीन वर्षांसाठी नोंदणी रद्द केली जाईल. राज्य कुस्तीगीर संघाच्या अधिकृत पत्रात, महाराष्ट्र केसरी किंवा इतर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा हक्क केवळ संघाकडे असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.
नुकतीच अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली गेली होती. या स्पर्धेच्या निकालावर नाराजी व्यक्त केली गेली होती, आणि यावरून कुस्तीगीर संघाच्या स्पर्धेतील पराभवावर वाद उभा राहिला. त्या नंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला स्वतंत्र स्पर्धा घेण्याची घोषणा केली होती.
आता, कर्जत-जामखेडमध्ये मार्च महिन्यात कुस्ती स्पर्धेचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. परंतु महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या विरोधामुळे या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. संघाने कुस्तीपटूंना इतर कोणत्याही संस्थेच्या स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई केली आहे, ज्यामुळे वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
यावेळी, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील एक मोठा वाद देखील झाला होता. पृथ्वीराज मोहोळ यांनी पराभूत केल्यानंतर नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली होती. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी गोंधळ उडाला आणि पोलिसांनी हस्तक्षेप केला. दोन्ही मल्लांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन आपली तक्रार व्यक्त करावी लागली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर, कुस्तीविश्वात विभागलेली स्थिती अजूनच जटिल बनली आहे.
हेही वाचा:
• आनंदाची बातमी! शेतकऱ्यांची तलाठ्यांकडील ही ११ कामे होणार झटपट; जाणून घ्या सविस्तर