Maharashtra Kesari | राज्यभरातील कुस्ती प्रेमींना एक मोठा आनंदाची पर्वणी मिळणार आहे, कारण यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धा कर्जत-जामखेड मतदारसंघातील कर्जत येथे 26 ते 30 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील अनेक नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन खास कुस्ती प्रेमींसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेसोबत आजपर्यंत 65 ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा पार पडल्या आहेत. या स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ बनलेल्या सर्व मल्लांनी राज्य व देशाच्या कुस्ती क्षेत्राला प्रतिष्ठा दिली आहे. यंदा कर्जत येथे होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्यावर आहे. शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीला मिळालेला दर्जा आणि त्याचे संरक्षण हे महत्त्वपूर्ण ठरले आहे.
स्पर्धेच्या आयोजनासाठी मैदानाचे पूजन शनिवारी कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी अॅड. प्रताप काका ढाकणे, ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त काका पवार, ‘हिंद केसरी’ अमोल बराटे, ‘महाराष्ट्र केसरी’ दत्ता गायकवाड, नवनाथ ढमाळ, बंकट यादव, आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीने या स्पर्धेला मान दिला.
सुमारे 900 मल्ल या स्पर्धेत भाग घेणार असून, आयोजकांनी आश्वासन दिले आहे की, प्रत्येक मल्लाला न्याय मिळेल. याबाबत आयोजकांच्या वतीने पूर्ण काळजी घेतली जाईल, आणि कुठेही अन्याय होणार नाही. आमदार रोहित पवार म्हणाले की, ‘माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांनी या स्पर्धेचे आयोजन अत्यंत योग्य पद्धतीने केले आहे. ‘महाराष्ट्र केसरी’च्या इतिहासात एक नवा अध्याय उघडण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि ही स्पर्धा अत्यंत यशस्वी होईल.’ कुस्तीचा उत्सव म्हणून ओळखली जाणारी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा कर्जतवासीयांसाठी एक अनमोल क्षण ठरणार आहे.
हेही पाहा:
• राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता घरकुल धारकांना पाच ब्रास वाळू मिळणारं मोफत
• आता सातबारा उतारा नसतानाही जमिनीची खरेदी करता येणार; फक्त ‘या’ 3 पद्धतींचा करा अवलंब