Cactus farming| निवडुंगाच्या शेतीतून करोडपती झाला शिरडीचा तरुण!

यशोगाथा

Cactus farming| अस्तगावचा सतीश अत्रे या तरुणानं पारंपारिक शेतीला रामराम करत निवडुंगाच्या शेतीतून (Cactus farming) करोडपती होण्याची किमया साधली आहे.

हवामानाच्या अनिश्चिततेमुळे शेती हा धोकादायक व्यवसाय बनला आहे. पण, शिरडी जवळच्या अस्तगावचा सतीश अत्रे या तरुणानं निवडुंगाच्या शेतीतून एक नवीच क्रांती घडवून आणली आहे.

नर्सरीचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्तगावमध्ये सतीशने निवडुंगाच्या शेतीला प्राधान्य (preference) दिलं. त्याच्या या प्रयत्नांना यश मिळालं आणि त्याचं नाव राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचलं. सतीशने निवडुंगाच्या रोपांवर संशोधन करत देश-विदेशातून विविध जातीच्या निवडुंगाची रोपे आणली आणि त्यांची लागवड केली. त्याच्या नर्सरीतील निवडुंगाची रोपे देशभरात प्रसिद्ध झाली आणि त्याला करोडपती बनवलं.

वाचा Happy friendship day| मैत्रीची जोडी: अथर्व आणि प्रणय

कसा केला प्रयोग?

सतीशने निवडुंगाच्या रोपांची लागवड करून भारतातील निवडुंगाच्या रोपांची साठवण केली. त्याने या रोपांवर पंधरा वर्षांपासून संशोधन करत आहे. त्याच्या नर्सरीत फुलझाडे, फळझाडे आणि औषधी वनस्पतींबरोबर विदेशातील निवडुंगाची रोपेही आहेत.

गुजरातमधील ‘स्टॅचू ऑफ युनिटी’मध्ये त्याच्या कामाला सर्वप्रथम (First of all) यश मिळालं. भारतातील सर्वात उंच असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या बाजूस असणाऱ्या चाळीस एकर जागेत गार्डन बनविण्याची जबाबदारी त्याला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बागेत स्कॅकटस अर्थात निवडुंगाची दोन एकर क्षेत्राची बाग असावी अशी इच्छा व्यक्त केली होती. सतीशने हे आव्हान स्वीकारलं आणि 2018 पासून सुरु केलेल्या कामात 40 एकर जागेत वेगवेगळी गार्डन्स बनविली. त्यात दोन हजार देश-विदेशातील फुलांची झाडे, दीड हजारहून जास्त निवडुंगाची झाडे आणि अनेक औषधी वनस्पतींता समावेश आहे.

सतीशच्या या यशाने अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे. तो म्हणतो, “मेहनत आणि आपल्या टॅलेंट च्या माध्यमातून मिळवलेल्या या यशापासून अन्य शेतकऱ्यानं प्रेरणा घेतली तर त्यांच्या व्यवसायातही समृद्धी येईल.”

निवडुंगाची शेती हा पारंपरिक शेतीपेक्षा अधिक फायदेशीर (Beneficial) ठरू शकतो हे सतीशने सिद्ध केलं आहे. त्याच्या या यशाचा इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *