Ram Shinde | विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड; भाजपने फिरवली पाठ, चर्चांना उधाण

कर्जत जामखेड

Ram Shinde | महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. या ऐतिहासिक निवडीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मान्यता देण्यात आली. यानंतर, अहिल्यानगर शहरातील माऊली सभागृहात त्यांच्या सत्कारासाठी सर्वपक्षीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अध्यक्षस्थानी होते, तर पोपटराव पवार, सत्यजित तांबे, हेमंत ओगले यांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. परंतु, या सोहळ्याला भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहिले नाहीत. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शिवाजी कर्डीले आणि मोनिका राजळे यांचा समावेश होता. भाजप पदाधिकाऱ्यांची शिर्डी येथे होणाऱ्या प्रदेश मेळाव्याच्या तयारीसाठी बैठक असल्याचे सांगितले जात असले तरी भाजप नेत्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! सरकार अवघ्या तीनचं महिन्यात कोसळणार; शरद पवारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा

राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी त्यांची भेट घेतली. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता, परंतु या भेटीदरम्यान रोहित पवार यांनी राम शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीवर राजकीय चर्चांना उधाण आले असून, ते एक गोड संकेत मानले जात आहेत.

राम शिंदे यांच्या निवडीवर भाजपने पाठ फिरवलेली असली तरी, त्यांच्या सभापतीपदीची निवड राज्यातील राजकारणासाठी एक मोठे पाऊल मानली जात आहे. आगामी राजकीय घडामोडींमध्ये याचा मोठा परिणाम होईल, असे वाटत आहे.

हेही वाचा:

आज मानव जातीच अस्तित्त्व धोक्यात! पृथ्वीवर आदळणार २ लघुग्रह, NASA अलर्ट मोडवर

प्रा. राम शिंदे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार, ॲड. अभय आगरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *