GBS Disease | राज्यभर जीबीएस (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) या आजाराने थैमान घातल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि सोलापूरसह विविध ठिकाणी या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नागपूरमध्ये ४५ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने राज्यभर चिंता निर्माण केली आहे. सध्या, रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (GBS Disease)
नागपूरमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जीबीएस आजारावर महत्त्वाची माहिती दिली आहे. पवार यांनी जाहीर केले की, कच्च्या किंवा कमी शिजवलेल्या चिकनमुळे जीबीएसचा धोका संभवतो.
काही दिवसांपूर्वी पोल्ट्री फार्ममधून घेतलेल्या नमुन्यांच्या तपासणीतून जीबीएसचे संभाव्य कारण समोर आले आहे. खडकवासला परिसरातील नागरिकांनी या तपासणीच्या निष्कर्षांची माहिती अजित पवार यांना दिली होती. त्यानंतरच त्यांनी याबाबतची माहिती दिली.
पूर्वी, पाण्यामुळे जीबीएस होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु आता चिकन आणि कोंबडीच्या मांसामुळे या आजाराचा धोका असल्याचे उघड झाले आहे. कच्च्या आणि कमी शिजवलेल्या चिकनमुळे या आजाराचे प्रमाण वाढू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अजित पवार यांनी यावरून मात्र एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने जीबीएस होण्याची शक्यता आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोंबड्या मारून टाकाव्यात. शिजवलेल्या चिकनचा वापर केला तरी योग्य precautions घेतल्यास धोका टाळता येऊ शकतो.” जीबीएस या गंभीर आजारापासून बचावासाठी चिकन योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने शिजवणे आवश्यक आहे. असाच एक धक्का देणारा निष्कर्ष अजित पवार यांनी काढला आहे.
हेही वाचा:
• महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर वाद, आदेशाचे उल्लंघन केल्यास ३ वर्षांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा
• आनंदाची बातमी! शेतकऱ्यांची तलाठ्यांकडील ही ११ कामे होणार झटपट; जाणून घ्या सविस्तर