Santosh Deshmukh | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री धनंजय मुंडे यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. सोमवारी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील काही धक्कादायक आणि क्रूर फोटो समोर आल्यानंतर, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या राजकीय पदाचा राजीनामा दिला. तथापि, त्यांचे संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. (Santosh Deshmukh Murder Case)
धनंजय मुंडे यांच्यावर खंडणी प्रकरणात थेट सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी केज कोर्टाला सादर केलेल्या चार्जशिटमध्ये हत्या खंडणीसाठी झाल्याचा दावा केला आहे. तसेच, आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत खंडणीसाठी सातपुडा बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाल्याचे सांगितले आहे.
त्याच वेळी, समाजसेवक मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत, संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात खूपच तणाव निर्माण झाला आहे, विशेषत: वाल्मिक कराड यांचे नाव चर्चेत असताना. कराड आणि मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते, कारण कराड कधीकाळी गोपीनाथ मुंडे यांच्याशी संबंधित होते आणि नंतर धनंजय मुंडे यांच्या सोबत काम करत होते.
या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या कुटुंबाला सल्ला दिला आहे की, त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात साक्ष दिली पाहिजे. त्यामुळे चर्चांमध्ये एक नवीन वळण येत आहे. आता सर्वांच्या नजरा कराड कुटुंबाच्या निर्णयावर आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात साक्ष दिली तर त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय भवितव्य गडगडू शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा:
• मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा! शेतकऱ्यांना दिवसा वीज अन् 1 कोटी 34 लाख घरांना मोफत लाईट