Jamkhed Cricket | जामखेड तालुका लवकरच क्रिकेटच्या रंगात न्हाऊन निघणार आहे. समाजसेवक निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आयकॉन प्रीमियर लीग २०२५’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ एप्रिल २०२५ पासून सुरू होणारी ही दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धा तालुक्यातील क्रिकेट (Jamkhed Cricket) इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे. या स्पर्धेमुळे जामखेडमधील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या लीगच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून नुकताच जामखेड येथील हॉटेल आमराई येथे खेळाडूंचा लिलाव मोठ्या थाटामाटात पार पडला. खझङ पद्धतीने झालेल्या या लिलावात आठ संघमालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि ८० हून अधिक प्रतिभावान खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार बोली लावली. या रोमांचक लिलाव सोहळ्याला स्थानिक नागरिक, राजकीय नेते आणि क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसराला एका उत्सवाचे स्वरूप आले होते.
लिलाव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जानकी (मामा) गायकवाड होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष महेश (दादा) निमोणकर आणि ल. ना. होशिंग विद्यालयाचे माजी प्राचार्य अनंता खेत्रे यांनी आपली उपस्थिती दर्शविली. त्यांच्या उपस्थितीने खेळाडू आणि आयोजकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
सहभागी होणारे संघ व संघमालक
या स्पर्धेत सहभागी होणारे संघ आणि त्यांचे मालक पुढीलप्रमाणे आहेत: १. समता वॉरीयर्स, जामखेड (संतोष गव्हाळे व रामशेठ निमोणकर), २. मेजर ११, जायभायवाडी (अशोक मुंढे, संदीप ठोंबरे, ड. अमोल जगताप), ३. आर्यन वॉरीयर्स, जामखेड (डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. आबेद जमादार), ४. शंभूराजे सुपर किंग, जामखेड (उमेश खुपसे, आलेश जगदाळे, शकील शेख, मनोज अडाले), ५. काटेवाडी वॉरीयर्स, काटेवाडी (दत्तात्रय बीर), ६. मावळा क्रिकेट क्लब (सुरजशेठ मुळे, ऋषी विटकर), ७. सोनपरी टायटन, जामखेड (संजय डोके, ड. घनशाम राळेभात), ८. एम. जे. नाईट रायडर्स (जमीरभाई सय्यद (बारूद)).
याव्यतिरिक्त, मनसेचे प्रदीप टापरे, बिबेक कुलकर्णी, युवा नेते राजेश बाव्हळ, नगरसेवक शामीर सय्यद, हवाशेठ सरनोबत, पोलीस अधिकारी अविनाश ढेरे, उद्धवराव हुलगुंडे, महादेव ऑबासे, संजय काळे, गोरे साहेब यांच्यासह अनेक पत्रकार आणि क्रीडाप्रेमींनी या लिलाव सोहळ्याला हजेरी लावली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन बिजय जाधव सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन अजय कोल्हे यांनी मानले. या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी मुनाफ शेख, शिवराज बिटकर, सागर आमले व तुषार म्हेत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांनी सांगितले की, “ही स्पर्धा केवळ एक खेळ नाही, तर ती तरुणाईसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धेमुळे गावात एक उत्साही वातावरण निर्माण होईल आणि जामखेडला एक नवी ओळख मिळेल.” आता सर्वांचे लक्ष १८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या रोमांचक क्रिकेट स्पर्धेकडे लागले आहे. ही स्पर्धा जामखेडच्या क्रीडा इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल यात शंका नाही.
हेही वाचा:
• आनंदाची बातमी! घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ; आता किती मिळणार अनुदान?