Jamkhed Election 2025 : नगरपरिषदेच्या निवडणुकीचा ढोल वाजला आहे. त्यामुळे राजकारणात मात्र हलकल्लोळ सुरू झालाय. जामखेड नगरपरिषद निवडणुकीची चाहूल लागताच सर्वच पक्षांत उमेदवारांच्या चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १२ मध्ये एक नाव सध्या जोरदार गाजतंय. लोकप्रिय चेहरा म्हणून अजय विश्वनाथ कोल्हे यांचं नाव पुढे येतंय.
या तरुणाने समाजकारणात घाम गाळत, लोकांमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली आहे. आता पक्षांमध्येही त्यांच्या उमेदवारीवरून चांगलीच कुजबुज सुरू झाली आहे. कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
अजय कोल्हे हे फक्त नावापुरते समाजसेवक नाहीत, तर त्यांनी अनेक वेळा लोकांच्या संकटात खांद्याला खांदा लावला आहे. एखादं काम करायचं तर थेट मैदानात उतरून करणं, ही त्यांची शैली. मग ते गरीबांसाठी मदत असो वा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम. कोल्हे नेहमी आघाडीवर दिसतात.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय की, जर या प्रभागातून कोल्हे रिंगणात उतरले, तर समीकरणं बदलू शकतात. त्यांच्या मागे तरुणांची फौज आहे, आणि समाजातील ज्येष्ठांचंही चांगलं पाठबळ मिळतंय. त्यामुळे कोणता पक्ष त्यांना तिकीट देतो याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, कोल्हे हे करून दाखवणारे व्यक्तिमत्त्व आहे. चर्चेपेक्षा कृतीतून उत्तर देणं ही त्यांची ताकद. लोकांशी थेट संपर्क, सौम्य वर्तन आणि तडजोड न करणारी भूमिका यामुळे ते आज जामखेडच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू झाले आहेत.
सामाजिक बांधिलकी, संघटनशक्ती आणि जनतेशी जोडलेला स्वभाव, या तिन्ही गोष्टींमुळे त्यांच्या उमेदवारीला वजन मिळालं आहे. नगरपरिषदेच्या मैदानात जर कोल्हे उतरले, तर सामना रंजक होणार यात शंका नाही.