Changes | नवीन वर्षाची सुरुवात: देशात पाच मोठे बदल…

Uncategorized

Changes | नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपल्या जीवनात काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम आपल्या पर्स, खात्यासह शेतीवरही होणार आहे. 1 जानेवारीपासून देशात पाच मोठे बदल होणार आहेत. पहिल्या बदलात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीपासून ते हवाई इंधनाच्या किंमतीपर्यंत बदल होणार आहेत.

एलपीजीचे दर वाढण्याची शक्यता:
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या घरगुती गॅस आणि व्यावसायिक एलपीजी गॅसचे दर बदलतात. यावेळी 14 किलोच्या स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल LPG Cylinder च्या किंमतीत बदल केले आहेत.

EPFO पेंशनर्सना मोठी भेट:
नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजे EPFO द्वारे पेंशनर्ससाठी नवा नियम लागू होणार आहे. आता पेंशनर्सना आपल्या पेन्शनची रक्कम देशातील कोणत्याही बँक खात्यातून काढू शकतात. यासाठी त्यांना अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज नाही.

UPI 123Pay ची ट्रांझक्शन लिमिट वाढली:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बेसिक फोनद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा देण्यासाठी युपीआय 123पे ची सुरुवात केली होती. आता याची ट्रांझक्शनची लिमिट वाढवून 10,000 रुपये करण्यात आली आहे.

शेअर मार्केटमध्ये बदल:
सेन्सेक्स, सेन्सेक्स-50 आणि बँकेक्सच्या मासिक एक्स्पायरीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा:
1 जानेवारी 2025 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे शेतकऱ्यांना विना गॅरंटी दोन लाखापर्यंतचे लोन मिळणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा आहे.
अधिक माहितीसाठी आपण संबंधित अधिकृत वेबसाइट पाहू शकता.

कर्जत-जामखेड च्या बातम्या साठी आजच जॉईन करा व्हाट्सअँप ग्रुप..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *