Rohit Pawar | “मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता”; नवी जबाबदारी समर्थकांच्या बळावर पार पाडणार, आमदार रोहित पवार

Rohit Pawar | कर्जत-जामखेड: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) मध्ये अलीकडेच सरचिटणीस आणि फ्रंटल व सेल विभागाचे प्रभारीपद अशी दुहेरी आणि महत्त्वाची जबाबदारी मिळालेले आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधताना मोठे विधान केले. “कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे आणि त्यातील प्रत्येक नागरिक माझा सदस्य आहे. मी रडणारा नव्हे, तर लढणारा कार्यकर्ता आहे. हे बळ तुम्ही मला दिले आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेली ही मोठी जबाबदारी मी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून निश्चितपणे पार पाडेन,” असे प्रतिपादन त्यांनी केले. (Karjat Jamkhed)

नव्या जबाबदारीवर निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात आल्यानंतर आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या सत्कार सोहळ्यात बाळासाहेब साळुंके, नामदेव राऊत, दीपक शहाणे, राजेंद्र देशमुख, ऋषिकेश धांडे, विशाल मेहेत्रे, भूषण ढेरे, अमृत काळदाते, रज्जाक झारेकरी आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

नवी जबाबदारी आणि आध्यात्मिक आशीर्वाद

नव्या जबाबदारीच्या निमित्ताने, आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथील काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा देणारे सद्‍गुरु संतश्री गोदड महाराज यांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी नव्या जबाबदारीसाठी महाराजांचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगीही मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, “पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.” या सर्व नव्या जबाबदारीला कार्यकर्त्यांचा विश्वास आणि स्वतःच्या प्रामाणिक मेहनतीच्या बळावर यशस्वीपणे पार पाडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समर्थकांचे उत्स्फूर्त प्रेम

निवडीनंतर मतदारसंघात प्रथमच आलेल्या आमदार रोहित पवार यांचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत झाल्यामुळे ते भारावून गेले होते. त्यांनी याप्रसंगी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानले. रोहित पवारांच्या या नव्या जबाबदारीमुळे पक्षाला विशेषतः युवा आघाडीला नवी ऊर्जा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष संघटनात्मक स्तरावर अधिक मजबूत होईल असेही बोलले जात आहे.

हेही वाचा:

जामखेडमध्ये विखे पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव शिबिर संपन्न

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठे फेरबदल: शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्षपदी, रोहित पवारांकडे मुख्य सचिवपदाची धुरा?

Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
0
Would love your thoughts, please comment.x
()
x