Rohit Pawar | कर्जतमध्ये भरदिवसा व्यापार्‍याला रिवाल्वर दाखवून लुटण्याचा प्रयत्न, रोहित पवारांनी दिला कठोर इशारा

Rohit Pawar | कर्जत शहरात भरदिवसा व्यापार्‍याला रिवाल्वर दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात गुंडगिरी आणि दहशतवादाच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कठोर इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या प्रकारच्या गुंडगिरीला कदापि खपवून घेतले जाणार नाही.

घटनेचा तपशील असा आहे की, कर्जत शहरातील प्रसिद्ध अडत व्यापारी प्रफुल्ल नेवसे यांचा मुलगा रामराजे हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुकानाकडे दीड लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग घेऊन जात असताना, बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन चोरटे त्यांच्या मागावर आले. चोरट्यांनी त्यांना अडवले आणि बॅग हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातच चोरट्यांने त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, पण रामराजे यांनी शर्टवर पडलेल्या मिरची पूडवर प्रतिकार करत जोरात आरडाओरड केली. यामुळे आसपासचे लोक धावले, ते पाहून चोरटे पळून गेले, मात्र त्यापैकी एकाचा पिस्तूल पडला. रामराजे यांनी ते पिस्तूल उचलले आणि यामुळे चोरटे घाबरून पळून गेले.

वाचा: विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याकडून महविकास आघाडीचे कौतुक, जाणून घ्या कारण….

याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी त्वरित प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी पोलिसांना आरोपींना पकडून कठोर कारवाई करण्याची सूचना दिली आहे. “गुंडगिरीचा कोणताही पॅटर्न मी खपवून घेणार नाही. पोलिसांनी कठोरपणे कारवाई करावी आणि गुंडांच्या मुसक्या तिथेच आवळाव्यात,” असे ते म्हणाले. त्यांनी नागरिकांना विश्वास दिला की, पोलिस यंत्रणा त्यांच्यासोबत आहे आणि गुंडगिरीला थांबवण्यासाठी शर्तीची कारवाई केली जाईल.

त्याचप्रमाणे, सभापती राम शिंदे यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी रामराजे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोलून आरोपींविरोधात तात्काळ कारवाई करण्याची सूचना दिली. यामुळे कर्जत शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, कर्जत शहरात पोलिसांचे गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा:

मोठी बातमी! मुख्यमंत्री बदलायची पाळी येणार, एकनाथ शिंदेंच्या नाराजी ठरणारं कारण?

शेतकऱ्यांनो आता तलाठी कार्यालयात फेऱ्या मारणे बंद! घरबसल्या करा वारसा नोंद, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
0
Would love your thoughts, please comment.x
()
x