Women’s Oppression | अहिल्यानगर जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेला धक्का, सरकारकडून कडक कारवाईची आवश्यकता

Women’s Oppression | राज्य सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली असली तरी महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारचे पाऊल ठोस ठरत नाहीत. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सरकारकडून अधिक कडक कारवाईची आवश्यकता आहे. गेल्या तीन वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या ८३३ घटनांची नोंद झाली आहे. त्यात विशेषत: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या (Women’s Oppression) घटना चिंताजनक प्रमाणात वाढल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना देशभरात आणि स्थानिक स्तरावर देखील चिंतेचा विषय बनल्या आहेत. शाळकरी मुलींना फूस लावून अत्याचार करणे, सोशल मीडियावर बदनामीची धमकी देऊन मुलींचा छळ करणे या सारख्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तीन वर्षांच्या कालावधीत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. या घटनांमुळे महिलांची आणि मुलींची सुरक्षा धोक्यात आहे.

गृहखात्याची भूमिका या संदर्भात समाधानकारक नाही. पोलिस प्रशासन अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ कारवाई करत असले तरी, घटनांमध्ये घट येत नाही. उलट, मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांचे सुरक्षिततेचे प्रश्न अधिक गडद झाले आहेत.

वाचा: कर्जतमध्ये भरदिवसा व्यापार्‍याला रिवाल्वर दाखवून लुटण्याचा प्रयत्न, रोहित पवारांनी दिला कठोर इशारा

गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात ४७४ मुली अत्याचाराच्या शिकार झाल्या आहेत. यामध्ये रस्त्यावर मुलींना अडवून पळवून नेऊन अत्याचार करण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या प्रकारच्या घटनांमुळे समाजातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रचंड चिंता निर्माण झाली आहे.

अशा स्थितीत सरकार आणि पोलिस यंत्रणेला कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना राबविणे आवश्यक आहे, अन्यथा ही समस्या आणखी गडद होऊ शकते. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी सर्वांगीण उपाययोजना राबविणे हेच आता प्राथमिक लक्ष्य असावे लागेल.

हेही वाचा:

आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना आज मॉकपोल प्रक्रियेची माहिती, पाच उमेदवारांची माघार

कर्जत खालापूरच्या शिंदे गटाच्या आमदाराची तीव्र प्रतिक्रिया, “आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण…”

Read Also:
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x