Jamkhed Taluka | जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शासकीय धान्यगोदाम, तलाठी कार्यालय व शासकीय दवाखान्याची शासकीय मालमत्तेची तोडफोड करून अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने ही मालमत्तांची तोडफोड केली, तसेच इमारतीवरील पत्रे, सागवानी दरवाजे, खिडक्या आणि लाकडे उचलली. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भय आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Jamkhed Taluka)
हे सर्व करत असताना, आरोपींनी गाळेधारकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देत, त्यांच्या गाळ्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गाळेधारकांनी खर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यावर चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संबंधित शासकीय मालमत्तेचे उल्लंघन करत आरोपींनी बंद असलेल्या गोडाऊनचे कुलूप तोडले आणि इमारतींतील साहित्य उचलले. जामखेड तालुक्यातील जुना सर्व्हे नंबर २८६ व नवीन सर्व्हे नंबर १३७ आणि गट नंबर ३६० मध्ये असलेल्या शासकीय संपत्तीलाही मोठ्या प्रमाणावर हानी पोहचवली आहे. या कृत्यामुळे शासनाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या गंभीर घटनेवर खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड तपास करत आहेत. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी आवाज उठवला असून, गावातील काही जागृत नागरिकांनी शिष्टमंडळ तयार करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारीांना निवेदन दिले, आणि या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की, लवकरच गुन्हा दाखल करून योग्य कारवाई केली जाईल. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास, गावातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा-
– Jamkhed Depo | जामखेड आगाराला दोन नव्या बसांचा लाभ; पांडुरंग माने यांच्या प्रयत्नांना यश, टप्प्याटप्प्याने 25 बस मिळणारं
–Lifestyle Tea vs Coffee | हिवाळ्यात कॉफी प्यायची की चहा? हिवाळ्यात आरोग्यासाठी दोघांपैकी कोणता सर्वात फायदेशीर आहे? जाणून घ्या