Jamkhed Crime | जामखेड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला छेडछाड करण्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना तालुक्यातील नचे गावात घडली असून, या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jamkhed Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूब गणी न शेख (रा. जवळा) आणि एक अनोळखी व्यक्ती या दोघांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अल्पवयीन मुलगी गेल्या एक ते दीड वर्षांपासून मेहबूब शेख याच्याकडून त्रास सहन करत होती. सुरुवातीला मुलीने याकडे दुर्लक्ष केले; परंतु आरोपीने तिचा छळ सुरूच ठेवल्याने तिने आपल्या कुटुंबियांना याची माहिती दिली.
दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी शाळा सुटल्यावर जेव्हा मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत घरी जात होती तेव्हा मेहबूब शेख आणि त्याचा साथीदार यांनी तिचा पाठलाग केला. मुलीच्या मागे जाऊन त्यांनी तिची छेडछाड केली आणि तिच्या मोटरसायकलला अडवले. मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने ओरड घातल्याने आरोपी पळून गेले. या घटनेची माहिती मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन आरोपी मेहबूब शेखला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.
वाचा: जामखेडच्या तरुणीची छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्या; मृतदेह ओढ्यात फेकला अन्… असा सापडला आरोपी
पोलिसांनी घटनास्थळी धावून जाऊन आरोपीला अटक केली आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करून आरोपींना अटक केली आहे, ही गोष्ट प्रशंसनीय आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
हेही वाचा:
• सामान्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट! LPG गॅस ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; लगेच पाहा नवे दर