Jamkhed Camp | अहिल्यानगर जिल्ह्यातील अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाचे आणि दिलासादायक शिबिर जामखेड येथे नुकतेच पार पडले. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (अहमदनगर), जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय (जिल्हा परिषद अहमदनगर), भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), कानपूर आणि एस. आर. ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले व मुली) येथे आयोजित या शिबिरात दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात-पाय बसवण्यात आले, तसेच कॅलिपरचे मोजमाप करून तात्काळ मोफत वितरणही करण्यात आले. (Jamkhed Camp)
या समाजोपयोगी कार्यक्रमाला जामखेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजय शेवाळे, जामखेड केंद्राचे केंद्र प्रमुख राम निकम सर, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार, आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश शेठ बाफना, करण ढवळे, ॲड. अरबाज सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नय्युमभाई सुभेदार यांनी सांगितले की, बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार ते दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी अहोरात्र काम करत आहेत आणि यापुढेही करत राहतील. महाराष्ट्र शासन आणि विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या शिबिराबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश शेठ बाफना
आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश शेठ बाफना यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले. त्यांनी डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचे, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम अवयव बसविण्याचे शिबिर आयोजित केल्याबद्दल आभार मानले. तसेच, दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने भरघोस निधी आणि पगारवाढ केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार व्यक्त केले.
या शिबिराला जामखेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजय शेवाळे, जामखेड केंद्राचे केंद्र प्रमुख राम निकम सर, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार, आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश शेठ बाफना, डॉ. यशस चुंबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक करण ढवळे, सामाजिक कार्यकर्ते नासीर चाचू सय्यद, प्रफुल्ल गवारे, प्रमोद आढे, दिपाली नागरगोजे (विषय शिक्षिका BRC जामखेड), ॲड. अरबाज सय्यद, शिवाजी वडेकर, राहुल भालेराव, निवासी मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक संदीप शिंगणापूरे, संतोष आडसुळ, अक्षय गन्हे, आदींसह कर्जत-जामखेड तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण शिबिरात १०० हून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांनी मोफत कृत्रिम अवयवांचा लाभ घेतला, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण झाला.
या शिबिरामुळे अनेक अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांना नव्याने उभे राहण्याची आणि स्वावलंबी जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी जपणारी शिबिरे दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
हेही वाचा: