NA Land Rule | जमीन नॉन-अॅग्रीकल्चरल (NA) कशी करावी? नवीन नियम आणि अर्जाची प्रक्रिया काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

NA Land Rule | महाराष्ट्रात शेतजमिनीसाठी ‘नॉन-अॅग्रीकल्चरल’ (NA) रूपांतरण आवश्यक असते, जेव्हा तुम्हाला शेतीतील जमिनीचा वापर इतर उद्देशांसाठी, जसे की घर, उद्योग किंवा इतर विकास कार्यांसाठी करायचा असतो. या प्रक्रियेची माहिती अनेकांना स्पष्टपणे समजत नाही, आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रेही अनेक वेळा न समजलेली असतात. (NA Land Rule)

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1979 नुसार, शेती (Agriculture) जमीन इतर उपयोगासाठी बदलण्यासाठी राज्य सरकारची परवानगी अनिवार्य असते. शेतजमिनीसाठी ‘NA’ मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे समजून घेऊ. (NA Land Rule and process)

NA Land Rule | जमीन ‘NA’ करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. 7/12 उतारा – जमिनीचा 7/12 उतारा, चार प्रती.
  2. महसूल प्रमाणपत्र – जर महसूल विभागाकडे रेकॉर्ड नसेल तर, महसूल अधिकारी कडून प्रमाणपत्र.
  3. 8-अ उतारा आणि फेरफार उतारा – यासह इतर महत्वाची कागदपत्रे.
  4. नकाशा– तालुका जमीन रेकॉर्ड कार्यालयाकडून, 5 रुपयांच्या कोर्ट स्टॅम्पसह.
  5. बिल्डिंग प्लॅन– इमारत बांधकामासाठी 8 प्रती आवश्यक.
  6. महामार्ग प्राधिकरणाचे प्रमाणपत्र*– जर जमीन महामार्गाच्या हद्दीत असेल तर, त्या प्राधिकरणाचा ‘ना हरकत प्रमाणपत्र’.
  7. ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र – ज्या जमिनीवर इतर प्रकल्प राबवले जात नाहीत हे सिद्ध करणारे प्रमाणपत्र.

NA Land Rule | जमीन ‘NA’ करण्यासाठी अर्ज कसा करावा?

जमीन ‘NA’ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो. अर्ज दाखल झाल्यावर तो तहसीलदारांकडे पाठवला जातो, जे त्याची तपासणी करतात. जमीन मालकाची तपासणी करून तलाठी ऑफिसकडून चौकशी केली जाते. प्रकल्प किंवा पर्यावरणीय अडचणींचा तपासणी केली जाते. सर्व तपासणीनंतर, जिल्हाधिकारी ‘NA ऑर्डर’ जारी करतात, आणि नंतर तलाठी कार्यालयात त्या जमिनीची नोंद होऊन ती अधिकृतपणे अकृषी म्हणून ओळखली जाते.

एनए मंजुरी नंतर काय मिळते?


एनए मंजुरी मिळाल्यावर, शेतजमीन घर, इमारत बांधणी किंवा व्यावसायिक प्रकल्पासाठी कायदेशीरपणे वापरता येते. यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी, तसेच घर किंवा इमारत उभारण्यासाठी कायदेशीर अधिकार मिळतो. जमीन एनए करण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असली तरी ती योग्य कागदपत्रांची पूर्तता आणि योग्य मार्गदर्शनाद्वारे साधता येते.

हेही वाचा:

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ! पीकविमा घोटाळ्याची केंद्रीय सरकार करणार चौकशी

उपमुख्यमंत्र्यांच्या मोठा निर्णय! धनंजय मुंडे यांना अजित पवार यांचा मोठा धक्का

Read Also:
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x