Rohit Pawar On Saif Ali Khan | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईत मध्यरात्री एका हल्लेखोराने जीवघेणा चाकू हल्ला केला. हल्ल्यात सैफ (Saif Ali Khan) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सैफच्या शरीरावर सहा जखमा आहेत, ज्यात दोन गंभीर आणि दोन किरकोळ जखमा आहेत. त्याच्या शरीरातून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला आहे. सध्या सैफ आयसीयु मध्ये आहे, आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. (Rohit Pawar On Saif Ali Khan)
हल्ल्याच्या बाबत पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे की हल्लेखोर सैफच्या घरात मागच्या बाजूने प्रवेश केला. हल्ल्यापूर्वी, हल्लेखोर सैफ आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुरच्या खोलीकडे जात होता. घरातील मोलकरणीने हल्लेखोराला पाहिलं आणि ती आरडाओरडा करू लागली. मोलकरणीच्या आवाजामुळे सैफ जागा झाला आणि तो बाहेर येऊन हल्लेखोराला रोखण्यासाठी धावला. याच दरम्यान हल्लेखोराने सैफवर चाकूने वार केले. या संघर्षात सैफ गंभीरपणे जखमी झाला आणि हल्लेखोर तिथून पळून गेला. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य जागे झाले.
https://x.com/RRPSpeaks/status/1879738230637211882?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1879738230637211882%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
या हल्ल्यानंतर, राजकीय आणि बॉलिवूड क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमठत आहेत. कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी हल्ल्याच्या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, “खून, खंडणी, चोरी हे गंभीर गुन्हे सर्रास घडत असून मुंबईत वांद्रे सारख्या भागातही सुरक्षित वातावरण नाही, हे चिंताजनक आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने राज्यातील गुन्हेगारीचे गंभीर स्वरूप समोर आणले आहे. मुंबईतील वांद्रे सारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागातही गुन्हेगारी वाढली आहे, हे चिंताजनक आहे. प्रसिद्ध व्यक्तीही सुरक्षित नाहीत, तर सामान्य नागरिकांचे काय?” असं ते म्हणाले. सैफच्या जखमांबाबत अधिक तपास सुरू आहे आणि त्याच्याकडून शुद्धीत आल्यानंतर तपासाची पुढील माहिती मिळवली जाईल.