Kinkrant 2025 | प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हा सण प्रत्येक वर्षी 14 जानेवारीला साजरा होतो, पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी 15 जानेवारीला ‘किंक्रांत‘ नावाचा एक खास दिवस येतो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या या दिवशी काही विशिष्ट शास्त्र आणि धार्मिक गोष्टी पाळाव्या लागतात. किंक्रांत दिवसाला ‘करिदिन’ असेही संबोधले जाते. (Kinkrant 2025)
किंक्रांत म्हणजे काय?
किंक्रांतीचा दिवस मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होतो. या दिवशी खास करून कोणतेही शुभ कार्य किंवा चांगले कार्य सुरु करण्याची परंपरा नाही. त्याला धार्मिकदृष्ट्या कारण आहे की, याच दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या त्रासातून लोकांना मुक्त केले. त्यामुळे हा दिवस ‘किंक्रांत’ म्हणून ओळखला जातो. पंचांगानुसार, या दिवशी ‘करिदिन’ म्हणून पूजा केली जाते, परंतु शुभ कार्यांची सुरुवात टाळली जाते.
किंक्रांतीच्या दिवशी टाळावयाची गोष्टी
१. शुभ कार्याची सुरुवात टाळा: किंक्रांत दिवशी नवीन व्यवसाय, घर बांधणी, लग्न किंवा इतर कोणतेही शुभ कार्य सुरू करू नये. हा दिवस नवा आरंभ करण्यासाठी योग्य मानला जात नाही.
वाचा: कर्जत तालुक्यात धक्कादायक घटना! अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला अन्….
२. लांबच्या प्रवासापासून दूर राहा: या दिवशी दीर्घ प्रवास करणं वाईट मानलं जातं, त्यामुळे घरातच राहून शांती साधण्याचा प्रयत्न करा.
३. घरातील वादविवाद टाळा: किंक्रांत दिवसाच्या निमित्ताने घरात किंवा इतरत्र वादविवाद टाळा. हे दिवस शांततेत घालवणं महत्त्वाचं आहे.
४. स्त्रियांनी शेणात हात न घालणे: खासकरून महिलांनी या दिवशी शेणात हात न घालण्याची शिफारस केली जाते.
५. कुलदैवताची पूजा: या दिवशी कुलदैवताची पूजा करून, घरातील सर्व सदस्यांनी गोड नैवेद्य दाखवून देवाचं आशीर्वाद घ्या.
६. केस विंचरणे: या दिवशी पूजेपूर्वी आणि घरातील केर काढण्यापूर्वी केस विंचरा.
किंक्रांत म्हणजे केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक भाग असतो. या दिवशी घरात आणि मनात शांती ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते. तसंच, या दिवशी कोणत्याही प्रकारच्या आवेगामुळे चुकता काम करणे हे टाळावे.
हेही वाचा:
• मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची? रोहित पवारांनी थेट नावासह कुंडलीच काढली
• कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई! प्लास्टिक मुक्त कर्जत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उचलले पाऊल