Jamkhed Car Accident | अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जामवाडी येथील एक भीषण रस्ते अपघात घडला आहे. या अपघातात बोलेरो कार पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली. (Jamkhed Car Accident)
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. जामवाडी येथे रस्त्याचे काम चालू होते, त्यामुळे खडी टाकलेली होती. या कारणामुळे वाहनचालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता येणं कठीण झालं आणि बोलेरो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत पडली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी होते, त्यामुळे गाडीतील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. परिणामी, कारमधील सर्व चार जण पाण्यात बुडून मरण पावले.
वाचा: मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची? रोहित पवारांनी थेट नावासह कुंडलीच काढली
मृत्यू झालेल्या व्यक्तींची ओळख अशोक विठ्ठल शेळके (२९), रामहरी गंगाधर शेळके (३५), किशोर मोहन पवार (३०), आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर (२५) अशी झाली आहे. या सर्वांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील, तसेच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने वाहन व मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
अग्निशामक दलाच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलं. या घटनामुळे जामवाडी गावावर शोककळा पसरली असून, संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्यावरील खडी आणि विहिरीच्या अनियमित संरचनेमुळे अपघात घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्थानिक प्रशासनाने अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे. या अपघातामुळे जामखेड तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे, आणि रस्ते सुरक्षा तसेच अवजड वाहनांच्या नियमनावर चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा:
• वाल्मिक कराडचं साम्राज्य किती मोठंय माहितीये का? करोडोच्या जमिनी, हायप्रोफाईल शहरात कार्यालये अन्…