Jamkhed News | जामखेडमधील 3 वर्षीय चिमुकलीचा टेम्पोच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू, दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ

Jamkhed News | जामखेड तालुक्यातील खर्डा गावात शनिवारी दुपारी एक हळहळजनक अपघात घडला. तीन वर्षीय परी लखन गायकवाड या चिमुकलीचा टेम्पोच्या (Accident News) चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (Jamkhed News)

मिळालेल्या माहिती नुसार, परी गायकवाड ही मुलगी सुर्वे गल्लीजवळ आपल्या घरासमोर रस्त्याच्या कडेला खेळत होती. त्या वेळी खर्डा बस स्थानकाच्या दिशेने एका टॉम्पोने रत्नसुरेश कॉम्प्लेक्सकडे जाणारा रस्ता घेतला. अचानक टेम्पोने परीला धडक दिली आणि ती त्या चाकाखाली चिरडली गेली. अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली, मात्र तोपर्यंत टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला होता.

चिमुकलीला लगेचच जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी डॉक्टर बिपिन लाड यांनी ॲम्बुलन्सची व्यवस्था केली. मात्र, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच परीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेह तिच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.

परीच्या आकस्मिक मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना गहिरा धक्का बसला आहे. तसेच, खर्डा गाव आणि त्याच्या परिसरात ही घटना घडल्यामुळे शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली असून, अपघाताची चौकशी सुरू आहे.

सदर अपघातामुळे रस्त्यांवरील वाहनांच्या वेगावर आणि चालकांच्या जबाबदारीवर चर्चा सुरू झाली आहे. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. परीच्या अचानक निधनामुळे तिच्या कुटुंबावर शोकाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा:

जामखेडमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन! राम शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन

दुसरीत शिकणाऱ्या जामखेडच्या सरल बोराटेचे हस्ताक्षर मोत्याहूनही सुंदर; सोशल मीडियावर लाइक्सचा पाऊस

Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x