Compensation | अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत शासनाचा महत्वाचा निर्णय! ‘या’ जिल्हयातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे होणार जमा

Compensation | मागील वर्षी, म्हणजेच २०२४ च्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात, अकोला जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) संकटांचा सामना करावा लागला. पावसामुळे शेतमालाची (Agriculture) नासधूस झाली, आणि अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मोठे नुकसान (Compensation) झाले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतीच शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने १८ मार्च २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ७९ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे. एकूण ५६ हजार ६४८ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होणार आहे.

वाचा: कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा

अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा आणि मूर्तिजापूर तालुक्यांमध्ये ५६ हजार ७०० शेतकऱ्यांचे ५७ हजार ३७१ हेक्टर क्षेत्र पूर आणि पावसाच्या तडाख्यात सापडले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आणि त्यांची आर्थिक स्थिती खूपच गंभीर झाली. यासोबतच ४८ शेतकऱ्यांच्या ३० हेक्टर क्षेत्राची जमीन खरडून गेली, ज्यामुळे त्यांना अजून अधिक अडचणींचा सामना करावा लागला.

राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाच्या मदतीने या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही वेगाने सुरू करण्यात आली आहे. २१ मार्चपासून संबंधित तहसील कार्यालयांमार्फत शेतकऱ्यांची यादी ‘ई-पंचनामा पोर्टल’वर अपलोड केली जात आहे. यानंतर ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की, “राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जात आहे, आणि लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.” या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून, पुढील हंगामासाठी त्यांना आधार मिळेल.

हेही वाचा:

महायुती सरकारचा बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय! आता 12 हजार रुपये मिळणारं निवृत्ती वेतन

अरे देवा! माव्यानंतर जामखेडच्या तरुणाईला लावले नशिल्या पानांचे व्यसन

Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
0
Would love your thoughts, please comment.x
()
x