Maharashtra Kesari | आठवड्याभरापूर्वी अहिल्यानगरमध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन दणक्यात करण्यात आले होते. त्यानंतर, राज्य कुस्तीगीर परिषदेने कर्जत-जामखेड येथे येत्या 26 ते 30 मार्चदरम्यान 66व्या ‘महाराष्ट्र केसरी‘ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेची माहिती संयोजक आणि आमदार रोहित पवार यांनी दिली. (Maharashtra Kesari)
राज्यात सध्या कुस्ती संघटनांमध्ये वाद निर्माण झाला असून, त्याच्या परिणामी दोन प्रतिस्पर्धी संघटना सक्रिय आहेत. दोन वर्षांपूर्वी नोंदणीकृत नसलेल्या एक संघटनेने अनधिकृतपणे ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेतील मल्लांवर झालेल्या अन्यायामुळे ती स्पर्धा कुस्तीपेक्षा अधिक चर्चेत आली. या अन्यायामुळे ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन अधिक पारदर्शक आणि राजकारणापासून मुक्त व्हावे, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे या 66व्या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या खऱ्या आणि मान्यताप्राप्त संघटनेच्या सहकार्याने होणार आहे.
स्पर्धेचे आयोजन कर्जत-जामखेड आणि अहिल्यानगर तालीम संघ यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. कुस्तीची परंपरा आणि खेळाडूंची मेहनत पाहता, यावर्षी स्पर्धेतील बक्षिसेही आकर्षक असतील. अहिल्यानगरमध्ये झालेल्या स्पर्धेत विजेत्यांना 20 लाख रुपयांपेक्षा महाग थार कार बक्षिस म्हणून दिल्या गेल्या होत्या. आगामी स्पर्धेतही अशीच आकर्षक बक्षिसे दिली जातील. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील बक्षिसे वीस लाख रुपयांच्या किमतीपेक्षा जास्त असलेल्या चारचाकी वाहनांचा समावेश असणार आहे.
राजकीय संघर्षामुळे स्पर्धेतील भाग घेणाऱ्या मल्लांची निवड महत्त्वाची ठरते. नव्या संघटनेने परिषदेच्या खेळाडूंवर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे यावर्षी कोणते खेळाडू ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत भाग घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कुस्तीच्या जगतात होणाऱ्या या मोठ्या स्पर्धेच्या आयोजनाने राज्यभरातील खेळाडू आणि रसिकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
हेही वाचा:
• १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जामखेडच्या नराधमाकडून अत्याचार; कोर्टाकडून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
• शेतकऱ्यांनो बाजरीच्या भावात वाढ! जाणून घ्या सोयाबीन, कापूस, लसूण आणि कारल्याचे ताजे बाजारभाव