Ahilyanagar | अहिल्यानगर येथे AVBPचा तणावमुक्त छात्र कार्यक्रम यशस्वी

कर्जत

Ahilyanagar | जामखेड, दि. २१ जानेवारी २०२५: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अहिल्यानगर शाखा, जामखेड येथे युवक सप्ताहाच्या निमित्त “तणाव मुक्त छात्र” हा कार्यक्रम ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. देवकर साहेब, डॉ. पन्हाळकर साहेब आणि जमादार सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना तणावावर मात करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. पन्हाळकर साहेब यांनी भूषवले.

वाचा: आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना आज मॉकपोल प्रक्रियेची माहिती, पाच उमेदवारांची माघार

जिल्हा कार्यालय प्रमुख रोहित आसने यांनी अभाविपची मांडणी केली. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरे, विद्यालय उपप्राचार्य प्रा. शेख सर, इतर प्राध्यापक, विद्यालय अध्यक्ष पार्थ चव्हाण, अनिकेत मदने आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

फडणवीसांचा ठाकरे गटाला मोठा धक्का! 35 नेत्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये केला प्रवेश

अहिल्यानगर जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेला धक्का, सरकारकडून कडक कारवाईची आवश्यकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *