मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील वाढलेली आर्दता यामुळे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या मते, मध्य महाराष्ट्रात 26, 27 आणि 28 डिसेंबरला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात हलका पाऊस, मराठवाड्यात ढगाळ वातावरण
विदर्भातील काही भागात 24 आणि 25 डिसेंबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही आर्दता वाढल्याने वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी
दुसरीकडे, उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट कायम असून हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि इतर काही राज्यांना कडाक्याच्या थंडीचा अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील तापमान वाढणार
महाराष्ट्रातील किमान तापमान येत्या काही दिवसात 2-3 अंशांनी वाढणार असून, गारठा कमी होण्याची शक्यता आहे.
पावसाचा यलो अलर्ट
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह काही जिल्ह्यांसाठी 26 डिसेंबरला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंडीचा जोर कमी होणार आहे. मात्र, पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
कर्जत-जामखेड च्या बातम्या साठी आजच जॉईन करा व्हाट्सअँप ग्रुप..