Ration Card KYC | राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी राज्य सरकारने लाभार्थ्यांसाठी “मेरा ई-केवायसी” अॅप सुरू केले आहे, ज्याद्वारे शिधापत्रिकाधारक आता घरबसल्या, मोबाइलच्या सहाय्याने त्यांचे केवायसी पूर्ण करू शकतात. यामुळे रेशन वितरण (Ration Card KYC) सुलभ होईल आणि लाभार्थ्यांना कोणत्याही दुकानावर जाऊन वेळ वाया घालवावा लागणार नाही.
शिधापत्रिकाधारकांना यापूर्वी स्वस्त धान्य दुकानांवर ई-पॉस मशीनच्या माध्यमातून केवायसी करणे आवश्यक होते. मात्र, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅनिंग करताना काही अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून सरकारने “मेरा ई-केवायसी” अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून लाभार्थी घरबसल्या थोड्याशा वेळात ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, लाभार्थ्यांना दोन्ही अॅप्स डाउनलोड करणे आवश्यक आहे:
- Mera E-KYC Mobile App
- Aadhaar Face RD Service App
अॅप डाउनलोड केल्यानंतर, सोप्या पद्धतीने खालील स्टेप्स फॉलो करून ई-केवायसी प्रक्रिया पार पडू शकते:
- अॅप इन्स्टॉल करा आणि सेटअप करा.
- Mera E-KYC अॅप उघडा, त्यात आधार क्रमांक टाका आणि OTP प्रविष्ट करा.
- चेहऱ्याची पडताळणी करा: समोरच्या कॅमेर्याद्वारे चेहरा स्कॅन करा आणि स्क्रीनवरील सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा.
- सत्यापन प्रक्रिया पूर्ण: यशस्वी पडताळणी नंतर, लाभार्थ्याची माहिती E-POS मशीनवर दिसेल.
अंतिम सत्यापनासाठी, अॅपमध्ये “E-KYC Status” तपासून हे लक्षात ठेवा की प्रक्रिया यशस्वी झाली आहे की नाही.
हेही वाचा:
• जामखेडमध्ये रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाची ज्वारी वितरित
• श्री क्षेत्र चौंडी विकासासाठी बृहत् आराखडा तयार करावा; प्रा. राम शिंदे