Jamkhed Crime | जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजता धनेगाव येथे छापेमारी करत, 19 लाख 53 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत ‘हीरापान मसाला’ (Hirapana Masala) नावाचा गुटखा व ‘रॉयल 717’ नावाची सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. या कारवाईत 1225 बॅग गुटखा आणि 63 बॅग सुगंधित तंबाखू मिळाल्या. (Jamkhed Crime )
या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रोहित मधुकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली गेली. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्यासह पुढील तपास सुरू आहे.
धनेगाव व आसपासच्या परिसरात अवैध धंदे व गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यापूर्वी देखील खर्डा शहरात तसेच इतर भागात प्रतिबंधित गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या मदतीने दैवदैठण येथून मोठ्या प्रमाणात अवैध दारु पकडली गेली. तसेच, नायगाव येथील ग्रामस्थांनी देखील तहसीलदार यांना निवेदन देऊन दारु विक्री थांबविण्याची मागणी केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यामुळे धनेगावातील अवैध गुटखा धंद्याला मोठा धक्का बसला आहे. परंतु, नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की, खर्डा पोलिसांनी यावर कायमस्वरूपी नियंत्रण का ठेवलेले नाही? अवैध गुटखा व दारु विक्रीच्या प्रकरणांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा असताना, स्थानिक पोलिसांची कारवाई कधी व कशी अधिक प्रभावी होईल, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. धनेगाव येथील ही कारवाई पोलिसांच्या कठोर व प्रभावी कार्यवाहीचे उदाहरण ठरली आहे, परंतु खर्डा परिसरातील अवैध धंद्यांविरोधात अद्याप अधिक कारवाईची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा:
• श्री क्षेत्र चौंडी विकासासाठी बृहत् आराखडा तयार करावा; प्रा. राम शिंदे