Valmik Karad | बीडमध्ये वादाचा वणवा! वाल्मिक कराडच्या बातम्या पाहणाऱ्या तरुणाला मारहाण

Valmik Karad | बीड जिल्ह्यातील स्थिती दिवसेंदिवस अधिकच तणावपूर्ण बनत चालली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर, बीडमध्ये गुन्हेगारी आणि काळे धंदे समोर येत आहेत. त्यातच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Valmik Karad ) यांच्या अटकेनंतर या सर्व घटनांना राजकीय वळण मिळाले आहे. अशा स्थितीत एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यात एक तरुण केवळ वाल्मिक कराड संबंधित बातम्या पाहणाऱ्याला गंभीर मारहाण करण्यात आली.

धारूर येथील एक तरुण, अशोक शंकर मोहिते, आपल्या मोबाइलवर संतोष देशमुख हत्या प्रकरणासंबंधीची बातम्या पाहत होता. याच दरम्यान, वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी त्याला पाहिले आणि त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनी अशोकला शिवीगाळ करत, “आमच्या बातम्या का पाहतोस?” आणि “तुझीच अवस्था होईल, संतोष देशमुख प्रमाणे,” अशी धमकी दिली.

मारहाण केल्यानंतर, अशोकवर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असताना, आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांमधून हे दोघे असल्याचं स्पष्ट झालं आहे. कृष्णा आंधळे, जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, त्याच्या समर्थनार्थ या दोघांनी WhatsApp स्टेटस ठेवले होते.

बीड जिल्ह्यात दोन समाजांमध्ये वाढत चाललेला तणाव, पोलीस प्रशासन आणि सरकारसाठी मोठं आव्हान बनला आहे. अशा परिस्थितीत या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागील कारण, पवनचक्की प्रकल्पासाठी खंडणी थांबवण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते लक्ष्य झाले, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. हत्येच्या तपासात गडबड आणि आरोपांमुळे बीडमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये राजकीय वादही वाढले आहेत. सध्याच्या परिस्थितीला तातडीने आवर घालण्याची गरज आहे, अन्यथा बीडमध्ये तणाव अधिकच वाढू शकतो.

हेही वाचा:

क्रिक स्पोर्ट्स जामखेड तालुका क्रिकेट लीग सुरू; रविवार ९ फेब्रुवारी २०२५ ला होणार अंतिम सामना

उपमुख्यमंत्र्यांच्या मोठा निर्णय! धनंजय मुंडे यांना अजित पवार यांचा मोठा धक्का

Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x