Dhananjay Munde | संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठे वादळ उठवले आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून राज्याच्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली जात आहे, तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर आज धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Dhananjay Munde Santosh Deshmukh)
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे यांनी एका संवादात सांगितले की, “संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी मी सुरुवातीपासूनच ठाम भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची जलद गतीने सुनावणी होऊन आरोपींना फाशी दिली जावी, अशी माझी मागणी आहे.”
तसेच, मुंडे यांनी पुढे नमूद केलं की, “माझ्या राजीनाम्याची मागणी राजकारणाचा भाग आहे. परंतु, जो मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं. मी कधीच आरोपाच्या फाशीपर्यंत जात नाही, पण माणुसकीच्या नात्याने हे न्यायासाठीचं आंदोलन महत्त्वाचं आहे.”
धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे सांगितले की, मीडिया आणि सोशल मीडियावर गेल्या 53 दिवसांपासून त्यांच्यावर एक प्रकारे माध्यम ट्रायल सुरू आहे. “मी मंत्री झाल्यावर कधीही भगवान गडावर गेलेलो नाही. मात्र, काल रात्री मी भगवान गडावर आलो, आणि आज या गडाचा पूर्ण पाठिंबा माझ्या पाठीशी आहे. यामुळे मला मोठा मनोबल मिळालं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंडे यांच्या या विधानावर राजकीय वर्तमनात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी, विरोधकांना हे मुद्दा आणताना त्यांना राजकारणापेक्षा अधिक जास्त महत्त्व दिलं जात आहे की संपूर्ण घटनेला न्याय मिळवून देणं महत्त्वाचं आहे. धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, राजीनाम्याचा मुद्दा त्यांना महत्त्वाचा नाही, परंतु संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणातील आरोपींना न्याय मिळवून देणं हे अधिक महत्त्वाचं आहे.
हेही वाचा:
• जामखेड बाजार समितीत राजकीय उलथापालथ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का
• अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना मोठा धक्का! सोन्याच्या दरात इतकी वाढ,जाणून घ्या आजचा भाव