GST | जीएसटी परिषदेचे महत्त्वपूर्ण निर्णय: काय स्वस्त, काय महाग?

Uncategorized

GST | जैसलमेर येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. पॉपकॉर्नवर कर लावण्याचा निर्णय तर चर्चेचा विषय बनला आहे, पण याशिवाय अनेक वस्तू आणि सेवांवर करात बदल करण्यात आले आहेत.

काय झाले स्वस्त?

  • फॉर्टिफाइड राइस केर्नल्स: यावर आता ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.
  • जीन थेरपी: ही पूर्णपणे जीएसटीच्या कक्षेबाहेर काढण्यात आली आहे.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी कार्यक्रमांतर्गत पुरवल्या जाणाऱ्या खाद्यसामग्री: यावर आता केवळ ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.
  • हवाई क्षेपणास्र असेम्ब्लिंग प्रणाली आणि आयएईए तपासणी उपकरणे: ही आता स्वस्त होतील.
  • काळी मिरी व बेदाणे (शेतकऱ्यांकडून पुरवठा): थेट शेतकरी विकत असलेल्या काळी मिरी व बेदाण्यांवर जीएसटी आकारला जाणार नाही.

  • काय झाले महाग?
  • जुनी, सेकेंड हँड वाहन: यावर आता १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.
  • रेडी टू ईट पॉपकॉर्न: पॅकेज्ड आणि फ्लेवर्ड पॉपकॉर्नवर १२ टक्के तर साखरेच्या पॉपकॉर्नवर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.
  • एसीसी ब्लॉक्स: यावर आता १२ टक्के जीएसटी आकारला जाईल.
  • कॉरपोरेट्सद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा: या महाग होणार आहेत.
    आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी कमी करण्याची अपेक्षा होती, मात्र याबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
    या निर्णयांचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. त्यामुळे खरेदी करताना या माहितीचा उपयोग करून घ्या.

कर्जत-जामखेड च्या बातम्या साठी आजच जॉईन करा व्हाट्सअँप ग्रुप..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *