Valmik Karad | बीडच्या मस्साजोगे येथील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात संशयित म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं आहे. आज केज कोर्टात झालेल्या सुनावणीत त्यांच्यावर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यासोबतच मोक्का लागू करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढे काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु त्याआधी, वाल्मिक कराड (Valmik Karad) यांचं आर्थिक साम्राज्य कसं आहे हे समजून घेऊया.
पुण्यातील एफसी रोडवर वाल्मिक कराडच्या नावावर 115 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या समोर असलेल्या एकापाठोपाठ सात दुकाने वाल्मिक कराड यांनी बुक केली आहेत. त्यापैकी चार दुकाने स्वतःच्या नावावर असून तीन दुसऱ्या पत्नीच्या नावावर आहेत. याशिवाय, या दुकानांच्या शेजारी एक दुकान विष्णू बहीण सोनावणे यांच्या नावावर आहे.
पुण्यातील हडपसरमधील एका प्रॉपर्टीमध्ये वाल्मिक कराड यांनी आपल्या ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोअर बुक केला आहे. मगरपट्टा सिटीमध्ये असलेल्या या फ्लोअरची किंमत सुमारे 75 कोटी रुपये आहे. त्याच्या आसपासच्या भागात एक फ्लॅट 15 कोटी रुपयांचा आहे. हे सर्व प्रॉपर्टी ही अत्यंत महागड्या भागात आहेत.
वाचा: कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई! प्लास्टिक मुक्त कर्जत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उचलले पाऊल
पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या एक ऑफिस स्पेस देखील दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर खरेदी केली आहे. सहाव्या मजल्यावर असलेल्या दोन ऑफिस स्पेसची किमतही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. यावरून, वाल्मिक कराड यांचं संपत्ती साम्राज्य किती मोठं आहे, याची कल्पना मिळते.
वाल्मिक कराड यांच्याकडे अनेक ठिकाणी जमिनींची मालकी आहे. शिमरी पारगाव, बारशी, जामखेड आदी ठिकाणी त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. शिमरी पारगावमध्ये 50 एकर जमीन, बार्शीत 50 एकर जमीन आणि वॉचमनच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन असल्याचं समोर आलं आहे. या सर्व प्रॉपर्टीजची किंमत आणि खरेदीची पद्धत, तसेच बेनामी संपत्त्यांचे आरोप या प्रकरणाला वळण देऊ शकतात. वाल्मिक कराड यांच्या प्रॉपर्टीच्या गुंतागुंतीला अधिक तपासणीची आवश्यकता आहे. याबाबत तातडीने इडी कडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अनेकांनी केली आहे.
हेही वाचा:
• ‘किंक्रांत’ म्हणजे काय? चुकूनही किंक्रांदिवशी ‘या’ चुका करू नका, अन्यथा होईल अनर्थ
• मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची? रोहित पवारांनी थेट नावासह कुंडलीच काढली